“आम्ही चुकुनच घेतला तुमच्या देशातील जमिनीचा ताबा”..‘या’ देशाचे आपल्या शेजारील देशाला विचित्र उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. कोरोनाच्या या संकटाचा सामना अनेक देश करत आहे. कोरोना संकटाच्या या काळात एका देशाकडून नुकतीच एक विचित्र घटना घडली आहे. युरोपातील पोलंड या देशाने आपल्या शेजारील राष्ट्र असलेल्या झेक रिपब्लिक या देशातील एका भूभागाचा ताबा घेतला असल्याची कबुली दिली आहे. पोलंडच्या संरक्षण मंत्रालयानं आम्ही चुकूनच झेक रिपब्लिक या राष्ट्राच्या जमिनीचा ताबा घेतल्याचं म्हटलं आहे. गेल्या महिनाभरापासून झेक रिपब्लिकच्या एका भूभागावर पोलंडनं ताबा मिळवल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांनी कोरोना या व्हायरसला रोखण्यासाठी काही पावलं उचलली. त्यावेळी त्यांनी झेक रिपब्लिकमधील एका चॅपलवर ताबा मिळवला. तसंच काही दिवस ते त्या ठिकाणी राहिल्याचही म्हटलं जातं आहे.

एवढेच नव्हे तर पोलंडच्या सैनिकांनी झेक रिपब्लिकहून येणाऱ्या लोकांनाही आत येऊ दिलं नाही. त्यानंतर झेक रिपब्लिकच्याअधिकाऱ्यांनी पोलंड सरकारशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. ही घटना झेक रिपब्लिकमधील शहर मोराविया इथे घडली आहे. पोलंडच्या अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना ही घटना चुकून घडल्याचं सांगितलं आहे. तसेच झेक रिपब्लिकच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्यापही यावर काही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आहे.

या घटने बद्दलची बातमी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आली होती. दरम्यान, त्यावेळी चॅपलच्या डागडुजीचं काम करणारा एका अभियंता जेव्हा त्या ठिकाणचा फोटो घेण्यास गेला, तेव्हा पोलंडच्या सैनिकांनी त्याला फोटो घेण्यापासून रोखलले. तससेच चॅपलकडे जाणारा रस्ताही अडवण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक वृत्तपत्रानं त्या ठिकाणी फोटोग्राफर पाठवून या घटने बाबतची माहिती घेतली.

हे चॅपल झेक रिपब्लिकच्या सीमेच्या ३० किलोमीटर आत अंतरावर आहे. या ठिकाणी एक पाण्याचा प्रवाह जो या दोन्ही देशांच्या सीमांना विभागतो. स्थानिक वृत्तपत्रानं दिलेल्या या माहितीनुसार पहिल्यांदा पोलंडचे सैनिक सुरूवातीला पोलंडच्या सीमेतच होते. मात्र नंतर त्यांनी झेक रिपब्लिकच्या सीमेत प्रवेश केला. दरम्यान, ते किती दिवसांपासून त्या ठिकाणी राहत होते, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment