हॅलो महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेत पोलिसांनी केली कारवाही; वाचा सविस्तर

 

औरंगाबाद | शहरामध्ये 14 एप्रिल रात्री आठ वाजेपासून संचारबंदी लावण्यात आलेली आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरात निर्बंधही सक्तीचे करण्यात आलेले आहे. निर्बंध आणि संचार बंदी असली तरी ही औरंगाबाद शहरातील शहागंज, पैठण गेट येथील कापड दुकाने, चप्पल दुकाने परवानगी नसताना सुद्धा छुप्या पद्धतीने सुरु होती.

यावेळी हॅलो महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी तेथे जाऊन वार्तांकन केले असता पोलिसांनी काही वेळातच बातमीची दखल घेत ती दुकानं बंद केलीत आणि दुकान चालकांवर कारवाही सुद्धा केली.

औरंगाबाद शहरात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, वैद्यकीय विभाग आणि पोलीस कर्मचारी जोमाने काम करत आहे. अशात नागरिकांची ही निष्काळजीपणाची भूमिका कितपत योग्य आहे आणि नागरिकांच्या निष्काळजी कृत्यामुळे कोरोनाचे संकट आणखीन वाढेल का? असा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

You might also like