अवैध वाळू वाहतूकीवर सापळा रचून पोलिसांची कारवाई, दोघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मायणी | खटाव तालुक्यातील कलेढोण येथील विटा-कलेढोण मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर मायणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विटा-कलेढोण मार्गावर कलेढोण हद्दीतून डंपरमधून अवैद्य वाळू वाहतूक रात्रीच्यावेळी सुरू असल्याची माहिती गोपनीय बातमीदारांकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल बाबुराव खांडेकर, नवनाथ शिरकुळे, प्रकाश कोळी, होमगार्ड रोहित घाडगे यांनी कलेढोण गावातील श्री खंडोबा मंदिराच्या तेथे सापळा लावला. त्यावेळी विटा-कलेढोण मार्गावरून माहिती मिळालेले वाहन क्रमांक (एमएच- १२- सीटी- ९७९४) येताना दिसले.

पोलिसांनी संबंधित वाहन थांबविल्यानंतर वाहनाबाबत चौकशी केली असता, यामध्ये विनापरवाना वाळू वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डंपर चालक सचिन मधुकर माने (वय २३, रा. घाणंद ता. आटपाडी जि. सांगली) व अमोल रामचंद्र जुगदर (वय ३२, रा. जांभुळणी ता. आटपाडी) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून डंपर किंमत ७ लाख व डंपर मधील अवैध वाळू ३ ब्रास २१ हजार रुपये असा एकूण ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेची नोंद मायणी पोलीस दूरक्षेत्रात झाली असून पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी तपास करत आहेत

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment