बुलेट शौकिनांनो सावधान! ‘हे’ केल्यास पोलीस उगारु शकतात कारवाईचा बडगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नंदुरबार । बुलेट वाहनाचे कंपनीचे सायलेन्सर काढून ध्वनीप्रदूषण करणारे सायलेन्सर बसवणाऱ्या (Nandurbar Police Action On Noisy Bullet Riders) बुलेट चालकांवर आजपासून नंदुरबार शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे. ज्या बुलेट वाहन धारकांनी कंपनीचे सायलेन्सर काढून प्रदूषण मुक्त सायलेन्सर बसवले असणार त्यांनी ते काढून कंपनीचे बसवून घेणे बंधनकारक आहे. ज्या बुलेटला असे ध्वनिप्रदूषणवाले सायलेन्सर आढळून येईल त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी दिले (Nandurbar Police Action On Noisy Bullet Riders).

नंदुरबार जिल्ह्यात अनेक महागड्या कंपनीच्या दुचाकी गाड्या आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असतं. त्यामुळे वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. ज्या मोटर सायकल त्या कंपनीचं सायलेन्सर नसून दुसऱ्या कंपनीचे ध्वनी प्रजुषण करणारं सायलेन्सर आहेत, अशा मोटरसायकलवर कारवाई केली जात आहे.

ज्या कंपनीच्या गाड्या आहेत त्याचं कंपनीचे सायलेन्सर वापरावा, असे आदेश वाहतूक शाखा नंदुरबार यांच्याकडून देण्यात येत आहे. जेणेकरुन ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण होणार नाही. त्यामुळे या वाहन मालकांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे यांच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात महसुल देखील होणार असल्याची माहिती दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नागरिकांकडून या कारवाईचं कौतुक देखील केलं जात आहे.

नागपुरात तीन हजार बुलेट चालकांवर कारवाई
यापूर्वी काही महिन्यांपूर्वी नागपुरातही बुलेट चालकांवर कारवाई करण्यात आली होती. जुलै महिन्यात कर्कश हॉर्न, मोठ्या आवाजाचा सायलेन्सर आणि फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या बुलेटवर नाहपूर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. यावेळी 3 हजार पेक्षा जास्त बुलेटचालकांवर कारवाई करण्यात आली होती.

फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध
मोटार वाहन कायदा-1988 आणि मोटार वाहन नियम-1989 नुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध आहेत. तरीही शहरात असंख्य वाहनचालकांची भाईगिरी सुरू आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment