सांगलीत पोलिसांचं ऑल आऊट ऑपरेशन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

पुलवामा घटनेनंतर देशामध्ये असलेल्या हाय अलर्ट सारख्या परिस्थितीमुळे सांगली पोलीस दल सज्ज झाले आहे. काल रात्री आठ वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध चौक, कॉर्नर, ब्रिज, बायपास रोड आणि रेल्वे स्थानक परिसर अशा एकूण २७ ठिकाणी ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशन मध्ये एकूण ५४७ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

या ऑल आऊट ऑपरेशन मध्ये ७० पोलीस अधिकारी आणि ६५३ पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या ऑपरेशन मध्ये रेकॉर्ड वरील आरोपींचा तपास करणे, फरारी असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, रेल्वे स्थानक, बस स्थानकांची तपासणी करणे, शहरातील महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यासाठी हि मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमे दरम्यान दारू बंदीच्या ६ केसेस, जुगारच्या २ केसेस, रेकॉर्डवरील ९३ आरोपींची तपासणी करण्यात आली, फरारी असलेल्या २४ आरोपींच्या याच मोहिमेदरम्यान मुसक्या आवळल्या, मद्यप्राशन करून वाहने चालवणे या ५३ केस सह मोटार अधिनियम कायद्यानुसार ५४७ केसेस अशी धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या या ऑल आऊट ऑपरेशन मुळे शहरातील गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

Leave a Comment