औरंंगाबाद | रेल्वे प्रवाशाचा मोबाइल चोरणा-या शाहीद आलम मोहम्मद हारुण (वय २१, रा. गिधा, चौबेटोल ता; चनपटीया जि. पश्चिम चंपारण बिहार,ह.मु.औरंगाबाद) याला लोहमार्ग पोलिसांनी गजाआड केले असून त्याची हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रूहिना अंजूम यांनी दिले आहेत.
अटकेत असेला शाहीद आलम मोहम्मद हारूण हा समृध्दी महामार्गाच्या कामावर क्रेशर चालविण्याचे काम करतो अशी माहिती लोहमार्ग पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे. शिवाजी चौल ता. हातगाव, जि. नांदेड येथे राहणारा महेश अशोकराव कन्नलवार (वय १८) हा २८ जानेवारी रोजी काचीगुडा सब्रीमाला एक्सप्रेसने कल्याण ते नांदेड असा प्रवास करित होता. रेल्वे जालना येथे थांबली असता चोरट्याने हातचालाखिने त्याच्या खिशातील आठ हजारांचा मोबाइल चोरुन नेला.
प्रकरणात औरंगाबाद लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर लोहमार्ग पोलिसांनी तपासाची चव्रेâ फिरवून रेल्वेतून मोबाईल चोरणाNया शाहीद आलम मोहम्मद हारुण (वय २१, रा. गिधा, चौबेटोल ता; चनपटीया जि. पश्चिम चंपारण बिहार,ह.मु.औरंगाबाद) याला गजाआड केले.