भोपाळला पळून जाणाऱ्या 13 वर्षीय मुलीला पोलीसांनी घेतले ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी भोपाळला पळून जात होती. क्रांती चौक पोलिसांनी शोध लावत पळून जाण्यापूर्वीच पकडले. शुक्रवारी क्रांती चौक पोलिसांनी ही कारवाई करत मुलीला ताब्यात घेतले. नागेश्वरवाडीतील एका दाम्पत्याने एका महिन्याची मुलगी दत्तक घेतली होती. ती मुलगी आता 13 वर्षांची आहे.

10 जुनला ही मुलगी बेपत्ता झाली. 11 जूनला तिच्या आईने क्रांती चौक पोलिसांकडे तक्रार केली. त्यांनी गांधीनगरातील मुलांवर संशय व्यक्त केला होता. त्यांची तक्रार नोंदवून घेताना सीसीटीएएस प्रणालीत अडथळे निर्माण झाले. त्यामुळे तक्रार नोंदवून घेण्यास वेळ लागणार होता. तक्रार नोंदविल्यानंतर तपास करेपर्यंत कदाचित अल्पवयीन मुलीबाबत काहीही घडू शकते, अशी शंका मनात आल्याने ड्युटी आॉफिसर उपनिरीक्षक अनिता बागुल यांनी तत्काळ मुलीचा शोध सुरू केला.

पोलिसांना ही मुलगी चिंतामणी मिठाई भांडार येथील कामगाराच्या संपर्कात असल्याचे लक्षात येताच बागुल यांनी महिला कॉन्स्टेबल जाधव, सहायक उपनिरीक्षक कुलकर्णी पोलिस नाईक बोरडे, पवार यांच्या पथकासह त्या कामगाराचा शोध घेतला. कामगार दुकानात सापडला त्याने बेपत्ता मुलगी पैसे घ्यायला येथे येणार असल्याचे सांगून ती पैसे घेऊन भोपाळला जाणार असल्याचे कळविले. त्यामुळे पोलिसांनी तेथेच थांबून मुलगी येताच तीला ताब्यात घेतले.

Leave a Comment