अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा पोलिसांच्या ताब्यात

दाैलताबाद पोलिसांची कारवाई

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाला दौलताबाद पोलिसांनी बुधवारी (३१ मार्च) रात्री अटक केली. दादासाहेब मारोती कोळगे (२०, रा. गाडीवाट गाव ता.जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव असून, त्याला ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. दहातोंडे यांनी दिले.

या प्रकरणी पीडितेच्या भावजीने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिताही फिर्यादीसह राहते. शुक्रवारी २६ मार्च रोजी रात्री फिर्यादीसह त्याचे कुटूंब जेवण करुन झोपी गेले होते. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फिर्यादीला जाग आली, तेंव्हा पीडिता घरात दिसली नाही. त्यामुळे फिर्यादीने शेजा-यांसह नातेवाईकांकडे विचारपूस केली, मात्र पीडिता सापडली नाही. तेव्हा फिर्यादीने दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.

या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करुन आरोपीला बुधवारी ३१ रोजी रात्री अटक केली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील किशोर जाधव यांनी आरोपीला पोलिस कोठडी मागितली. आरोपीने पीडितेला कोणत्या उद्देशाने व कोठे पळवून नेले होते. आरोपीला गुन्ह्यात कोणी सहकार्य केले, याचा तपास करणे आहे. तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like