Thursday, March 30, 2023

नशेच्या गोळ्या विकणारा पोलिसांच्या जाळ्यात

- Advertisement -

औरंगाबाद प्रतिनिधी । नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यास सिटीचौक पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने गजाआड केले आहे. ही कारवाई गुरूवारी दुपारी शहागंज परिसरातील चेलीपुरा भागात करण्यात आली. शेख अतीक शेख अब्दुल्ला वय ४२, राहणार खत्री दवाखान्याजवळ, चेलीपुरा असे नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्याचे नाव आहे.

चेलीपुरा भागात एक जण नशेच्या गोळ्या विक्री करीत असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सिटीचौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रविण पाथरकर, जमादार संजय नंद, संदीप तायडे, देशराज मोरे, बालाजी तोटेवाड, माजीद पटेल, क्षीरसागर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक राजगोपाल बजाज आदींच्या पथकाने चेलीपुरा चौकात सापळा रचून शेख अतीक याला ताब्यात घेतले.

- Advertisement -

पोलिसांनी शेख अतीक याची झडती घेतली असता, त्याच्याजवळून ४ हजार ७७० रूपये कींमतीच्या नशेच्या गोळ्याच्या ८० स्ट्रीप्स मिळून आल्या. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.