औरंगाबाद विद्यापीठ आवारात अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांना पोलिसांचा चाप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शहरातील दोन वेगवगळ्या महाविद्यालयातील युवकांना सार्वजनीक ठिकाणी अश्लील चाळे केल्याप्रकरणी दोन युवकांना आज बेगमपुर पोलिसांनी अटक केली. यात टीकटॉक प्रेमींची दर दिवशी नव्याने भर पडत आहे. यामुळे विद्यापीठात येणा-या प्रत्येकाला याचा नहाक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे विद्यापीठ प्रशासन डोळे झाक करत असल्याच पहायला मिळत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून रोडरोमिओंचा सुळसुळाट वाढला आहे. सेल्फी, फोटो काढणे, रस्त्यावर गाडया उभ्या करणे, वाहन शिकण्यासाठी गाडया फिरविणे, परिसरातील बागांमध्ये अश्लिल चाळे करणे असे प्रकार वाढले आहेत. विद्यापीठ परिसरातील रस्त्यावर वाहने उभे करुन वाहतुकीस अडथळे निर्माण केले जात आहेत. अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी शहरातील विविध महाविद्यालयात शिक्षण घेतात. मात्र तासिका बुडवून विद्यापीठ परिसरात काही जोडपे फिरत असतात. आज अशाच दोन प्रेमी युगुलांना विद्यापीठ परिसरात अश्लील चाळे करतांना पोलिसांनी पकडले आहे.

हे विद्यार्थी शहरातील दोन वेगवेगळ्या महाविद्यालय शिक्षण घेत आहेत. त्यात एक उस्मानपुरा येथील शासकीय महाविद्यालय तर दुसरा एस.बी महाविद्यालयातील आहे. हे दोघे जण आपल्या मैत्रिणींना सोबत घेउन सकाळ च्या सुमारास विद्यापीठात दाखल झाले होते. याठिकाणी हिस्टरी उद्यान जवळ रस्त्यावर हे दोघे प्रेमी युगुल थांबले होते. त्याच सुमारास विद्यापीठात अंदोलन सुरु असल्याने बहुतेक जण त्याठिकाणी उपस्थीत होते. याचाच फ़ायदा घेत या मुलांनी अश्लील चाळे करत असल्याच पोलिसांना आढळून आले. त्या अनुषंगाने पोलिसांनी या दोन्ही युवकांना सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करण्यासंदर्भात अटक केली.

या संदर्भात पोलिस निरीक्षक सानप यांनी ही महिती दिली. ही कारवाई बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलिसांनी या दोन्ही युवकांच्या दुचाकी देखील जप्त केली आहे. त्यामुळ पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा सर्व स्तरातून अभिनंदन केल जात असुन यापुढे देखील अशीच कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment