औरंगाबाद – शहरातील स्टंटबाज प्रियकराला जिन्सी पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केली आहे. प्रियसीला गाड़ीवर समोरच्या बाजुला बसवून किसींग करत हा तरुण गाडी चालवित होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या तरुणाचा शोध सुरु केला.
त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण अपेक्स हॉस्पिटलजवळ असल्याची माहिती जिन्सी पोलिसांना मिळाली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. सुरज कांबळे (वय 24. रा.बीडबायपास, अशोकनगर) असे या तरुणाचे नाव आहे. त्याची चौकशी केली असता त्याने, सदरील कृत्य हे 31 डिसेंबर रोजी रात्री क्रांतीचौक ते सेव्हनहील दरम्यान केल्याची कबूली दिली. मित्रांनी डेअरिंग दिल्याने असे केल्याचीही त्याने कबुली दिली. यावरुन त्याच्या विरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कामगिरी पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे आणि जिन्सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंता तांगडे, हेड कॉन्स्टेबल जगताप, संतोष बमनात आणि बाविस्कर यांनी यशस्वी पार पाडली.