नांदेड : नायगाव तालुक्यात राहेर येथे चक्क वांग्याच्या पिकात गांजाची 38 झाडे लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 62 किलो वजनाची गांजाची झाडे असल्याचे आढळून आले. यावेळी 38 गांजाची झाडे जप्त केली असून, याची किंमत तीन लाख रुपये असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नायगाव तालुक्यात राहेर येथे राहणाऱ्या शेतकरी बळीराम गंगाराम घोरपडे यांची बिलोली तालुक्यातील हरनाळा येथे शेती आहे. गुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरणाळा परिसरात असलेल्या गटनंबर 36 मधील शेतात वांग्याचे पीक घेतले आहे. या वांग्याच्या पिकात गांजाच्या झाडाची लागवड केली. घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन सोनवणे यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी हरणाळा शिवारातील शेतात छापा टाकला.
यावेळी वांग्याचे पिकाय गांजाचे 38 झाडे लावल्याचे दिसून आले शेतकरी बळीराम घोरपडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच बिलोलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे व नायब तहसीलदार ओम प्रकाश गावंडे यांच्या उपस्थितीत पंचनामा करून 65 किलो वजनाचे 38 गांज्याची गाडी जप्त करण्यात आली. सदर प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.