अबब…मोलकरणीनंच चोरले 91 तोळ्याचे दागिने, सापळा रचून केली पोलिसांनी अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरात एखादी चोरीची घटना घडल्यास ती चोरी करण्याचे आव्हान पोलिसांपुढे राहते. घरात बाहेरून तर कोणी येऊन चोरी केली तर नसेल ना असा संशय कुटूंबातील व्यक्तींकडून केला जातॊ. मात्र, घरातील मोलकरणी हि अत्यंत विश्वासू असल्याने तिच्यावर कोणी संशय घेत नाही. पण जेव्हा तीच चोरी करते आणि तिने केलेली चोरी पकडली जाते तेव्हा चक्रावून जातात. अशीच चक्रावुन सोडणारी घटना उल्हासनगर या ठिकाणी घडली आहे. एका खरात काम करणाऱ्या मोलकरणीने चक्केक नाही दोन नाही तर तब्बल 91 तोळे सोन्याचे दागिने चोरले आहेत. तिची हि चोरी सीसीटीव्हीत कैद झाली असून तिला पोलिसांकडून अटकही करण्यात आली आहे.

उल्हासनगर येथे घडलेल्या चोरीच्या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या घटनांप्रमाणे इतरही ठिकडायचे हे आव्हान पोलिसांपुढे होते. पोलिसांनी अनेकवेळा चोरट्याला पकडण्याचा प्रयत्नही केला. मात्र, प्रत्येकवेळी संबंधित चोरी करणारी महिला हि पोलिसांना चकवा देत होते. अखेर तिची चोरी सिसिटीव्हीत कैद झाली. क्राइम ब्रांचने महिला अटक केली असून तिच्याकडून 25 तोळे सोने हस्तगत केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगळे यांनी दिली. संबंधित फरार झालेल्या आरोपींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राम तनवाणी हे राहतात. त्यांच्याकडे घरकाम करण्याच्या बहाण्याने एक महिला आली होती. तीन-चार दिवसांपूर्वीच ती घरकाम करण्यासाठी आली होती. घरातल्यांच्या नकळतपणे तिने चावी सोबत नेली होती. तक्रारदार आणि त्यांचे कुटुंब बाहेर गेले होते. त्यावेळी या महिलेने घराचा दरवाजा आपल्याकडील चावीने उघडले आणि प्रवेश केला. घरातील 91 तोळे सोने चोरून पोबारा केला होता. तनवाणी कुटुंब घरी परतल्यानंतर ही धक्कादायक बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Leave a Comment