गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

औरंगाबाद | गंगापुर नविन कायगाव येथे गावठी कट्टा व जीवंत काडतुसे खरेदीविक्री प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. ही घटना 20 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता घडली. गंगापूर पोलिसांनी ही कारवाई केली.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, पो. नि. संजय लोहकरे यांना फजल सरदार शेख (वय-32 नविन कायगाव ता. गंगापूर) हा गावठी कट्टा सोबत बाळगत असल्याची गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. यावरून पो. नि. लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक औटे, पोहे कॉ. विजय भिल्ल, कैलास निंभोरकर आदींनी कायगाव येथे रात्री नऊ वाजेच्या सुमारास सापळा रचत फजलच्या सहारा चायनीज सेंटरवर छापा टाकला या छाप्यात अफजलच्या कमरेला गावठी बनावटीचा कट्टा व मॅक्झिनमध्ये दोन जिवंत काडतूस असा एकूण 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी फजल सरदार शेख याने हा कट्टा आरोपी गणेश अशोक सोनवणे आणि सुरज सतीश पदार (दोघेही रा. गंगापूर) यांच्याकडून खरेदी केला असल्याची माहिती पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी या दोघांना एकमिनार चौकातील हॉटेलमधून ताब्यात घेतले.

You might also like