भरधाव वेगाने निघालेल्या कारमध्ये सापडले लाखो रुपयांचे घबाड, पोलिसांकडून चौघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी ।  प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या १०० फुटी रोडवर असणाऱ्या चेतना पेट्रोल पंप समोर भरधाव वेगात निघालेल्या इंनोव्हा गाडीमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची बेकायदेशीर रक्कम आढळली. त्रिमूर्ती चौक येथे नाकाबंदी साठी असलेल्या पोलिसांनी सदरची गाडी पकडली असता मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागले. या गाडीमध्ये एकूण ६३ लाख ५० हजार रुपये सापडले. या प्रकरणी कोल्हापुरातील चौघांना अटक करण्यात आली आहे.

इनायतुल्ला पुणेकर, जावेद इब्राहिम पुणेकर, आशिष हिरालाल शुक्ला आणि गणेशप्रसाद गंगाप्रसाद गुर्जर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक इंनोव्हा कार आणि रक्कम असा एकूण ८९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई हि सोमवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिले होते. त्या प्रमाणे विश्रामबाग पोलिसांनी १०० फुटी रोडवरील त्रिमूर्ती चौक येथे नाकाबंदी केली होती.

सोमवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास चेतना पेट्रोल पंप कडून भरधाव वेगात एक इंनोव्हा कार येत होती. पोलिसांना गाडीचा संशय आल्याने त्यांनी सदरची गाडी थांबवून तपासणी सुरु केली. या गाडीमध्ये संशयित चौघे बसले होते. गाडीची झडती घेतली असता पाठीमागील सीटवर एका बॉक्स मध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम पोलिसांना मिळून आली. सदरची रक्कम हि पंचासमक्ष मोजली असता तब्बल ६३ लाख ५० हजार रुपये इतकी निघाली. त्या नंतर चौघांना अटक करण्यात आली.

Leave a Comment