औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस स्टेशन हद्दीच्या परिसरात व इतर ठिकाणी चोरी, दरोड्यासारखे गुन्हे करून पळून जाणाऱ्या सराईत गुन्हेगारांची शिल्लेगाव पोलिसांनी गुप्तरित्या माहिती काढून त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या.
ताराचंद विरुपन भोसले, शक्तूर भोसले (दोघे रा. गाजगाव, ता. गंगापूर) या कुख्यात दरोडेखोरांच्या मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. गुन्हेगारांनी पोलीस ठाणे शिल्लेगाव, वैजापूर, वाळूज, गंगापूर हद्दीत चोरी, जबरी चोरी, दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे, दरोडा असे अनेक प्रकारचे गुन्हे केलेले असून त्यांना वरील पोलीस ठाण्यात फरार म्हणून घोषित करण्यात आले होते.
दरम्यान, ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल ढाकणे, पोलीस अंमलदार रमेश अफसनवाड, सविता वरपे, मनोज नवले, विठ्ठल जाधव, मनोज औटे, सचिन चव्हाण, शुभम पालवे, संतोष गिरी यांनी केली आहे.