औरंगाबाद | शहरातील हिमायत बाग येथील आंब्याच्या दुकानावर आंबे विक्रीसाठी घेऊन बसलेला व्यापारी विनोद ज्योतिष कुंभार याला आरोपी प्रवीण मधुकर सोळस हा व्यापाऱ्यांकडून फुकटात आंबे घेऊन गेला त्याला रोखले असता आरोपीने मोटरसायकलवर येऊन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच बरोबर आंब्याच्या टोपलीभर तलवारीने मारत फुकटात आंबे देण्याची मागणी केली.या सर्व प्रकारानंतर व्यापाऱ्याने बेगंपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार झाला. गुन्हा शाखेतील कर्मचाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक धोंडे व त्यांच्या टीमने सापळा रचला आणि आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्यासंबंधी विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिली. गुन्ह्यात वापरली गेलेली 30 इंच लांबीची धारदार तलवार पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे.