सहकाऱ्याची गाडी चोरून त्याच्याच समोर वापरणाऱ्याला पोलीसांनी केली अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याची गाडी पळवून वापरल्याची घटना समोर आली आहे. गुन्हे शाखेने याबाबत माहिती घेऊन बिंग फोडले आहे. सोबत काम करणाऱ्यांची दुचाकी चोरून सुरुवातीला गावाकडे नेऊन वर्षभर तिकडेच वापरली, शेवटी त्या गाडीचा चेहरा मोहरा बदलून पुन्हा तीच दुचाकी घेऊन त्याच्या समोरच वापरायला सुरुवात केली. परंतु ही माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली असता, त्यांनी चेसिस क्रमांकावरून दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले आहे. आणि गुरुवारी दिनांक 17 रोजी चोरट्याला अटक केली.

दीपक दिगंबर सोनटक्के (रा. राजनगर, मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाजवळ) असे दुचाकी चोराचे नाव आहे. सेट्रिंग काम करणाऱ्या एका तरुणाची दुचाकी 2020 मध्ये उल्कानगरी भागातून चोरीला गेली होती. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तरुणा सोबत दीपक सोनटक्के हा तरुण सेट्रिंग चे काम करतो. मागील वर्षी लोकांमध्ये तो गावी गेला होता. तेव्हा ही चोरलेली बाईक घेऊन जवळपास तो वर्षभर गावी थांबला.

त्यानंतर या वर्षीच्या लॉकडाऊन उघडल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा तीच बाईक घेऊन तो औरंगाबादला परतला. त्याचबरोबर ज्या सहकार्याची दुचाकी त्याने चोरून नेली होती. त्या सहकार्‍यांसोबत तो पुन्हा सेट्रिंगचे काम करू लागला. याचवेळी एका खबर्‍याने सहाय्यक निरीक्षक अजित सिंग जारवाल यांना माहिती दिली. त्यांनी क्रमांकावरून दुचाकी ओळखण्याचा प्रयत्न केला. परंतु नेमकी माहिती समोर आली नाही. शेवटी चेचिस क्रमांकावरून ही दुचाकी चोरीची असल्याचे स्पष्ट झालं आहे.

Leave a Comment