हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लावणी क्वीन म्हणून ओळख असलेल्या गौतमी पाटीलचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली होती. या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात होता. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर त्या आरोपींना पकडण्यात यश आले आहे. एका अल्पवयीन मुलाने व त्याच्या साथीदारानेच तिचा तो व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी साताऱ्यातील एका अल्पवयीन मुलांसह दोघांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विमानतळ पोलिसांनी गौतमीच्या त्या व्हिडिओ संदर्भात अल्पवयीन मुलांसह दोघांना पकडले. पोलिसांनी संबंधित मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी तिच्याच नावाने बनावट खाते काढून कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याचे पोलिसांनी दिसून आले. याप्रकरणी आयुष अमृत कणसे (वय २१, रा. भरतगाव वाडी, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणात विमातनळ पोलीस ठाण्यात विनयभंग व आयटी अॅक्टचा गुन्हा नोंद होता. गौतमी पाटीलच्या सहकारी तरुणीने याबाबत तक्रार दिली होती. ही कारवाई परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विलास सोंडे, सहाय्यक फौजदार अविनाश शेवाळे, पोलीस अंमलदार किरण खुडे, रेहाण पठाण, अंकुश जोगदंड, दादासाहेब बर्डे, आस्मा शेख, रेणुका भोगावडे, प्रियंका शिंदे व त्यांच्या पथकाने केली आहे. दोन महिन्यांपुर्वी (२५ फेब्रुवारी) गौतमी पाटीलचा सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. कपडे बदलानाचा तो व्हिडीओ होता.
प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या गौतमीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. तर, अनेकांकडून या घटनेचा निषेध देखील केला गेला होता. याप्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून आरोपीचा शोध घेतला जात होता. तांत्रिक तपासानुसार पोलीस अहमदनगर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलापर्यंत पोहचते. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील भरतगाव वाडी येथून आयुष कणसे याला पकडले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. दरम्यान, तपासात हा व्हिडीओ यवत परिसरातील एका कार्यक्रमदरम्यान काढल्याचा संशय आहे. समोर आला आहे.