सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील सुरूर येथील धावजी पाटील मंदीरात घडलेल्या जादूटोणा प्रकरणातील आरोपीना जेरबंद करण्यात तसेच अन्य 2 अल्पवयीन मुलींच्या गुन्हयातील अल्पवयीन मुलींना ताब्यात घेण्यात भुईंज पोलीसांना यश आले आहे. याप्रकरणातील आरोपी हे फरार झाले होते मात्र त्यांना पकडण्यात भुईंज पोलिसाना यश आलं आहे.
सुरूर येथे 25 फेब्रुवारीला धावजी पाटील मंदीरात संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान दर्शनासाठी गेलेल्या एका भाविकाने मंदीरात सुरु असलेला अघोरी उपचार व गुलालाचे रिंगणात ठेवलेले साहित्य लिंबू, तसेच त्या लिंबाला टाचण्या टोचून त्यातील रस समोर बसलेल्या अनोळखी इसमाच्या तोंडात ओतून त्याला घाणरेड्या शिव्या देत असल्याचे रेकॉर्डिंग आपल्या मोबाईलमधे करून त्याद्वारे भुईंज पोलिसांत जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत चार संशयित व्यक्तींविरोधात फिर्याद दिली होती.
यांनतर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार, अज्ञात मात्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपी हे अनोळखी असल्याने त्यांना पकडणे हे पोलीसांच्या समोर आव्हानच होते. भुईंज पोलीसांनी एक विशेष पथक तयार करून धावजी पाटील मंदीर परिसरातील सी. सी. टिव्ही फुटेज आणि काही गोपनीय माहितीद्वारे आरोपीना ओळखून त्यांना ताब्यात घेतलं. सदर आरोपीची नावे दिगंबर कोंडिवा शिंदे (वय 57) आणि सोमनाथ दिनकर पवार (वय 53) असून ते पुणे शहरातील बुधवार पेठ येथील आहेत.