पोलीसाची गुंडागर्दी सोशल मीडियावर व्हायरल

लातूर : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील चवनहिप्परगा गावात एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पोलिसाने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने लाठी आणि लाथा बुक्याने मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

देवणी तालुक्यातील चवनहिप्परगा गावात ही घटना घडली आहे. शेतकरी गंगाधर कोतवाड यांचा शेजारील शेतकऱ्यासोबत शेतीच्या कारणावरुन वाद झाला होता. त्यानुसार एकाची बाजू ऐकून घेत पोलीस कर्मचारी रमेश कांबळे यांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप कोतवाड यांनी केली आहे.रमेश कांबळे यांनी शेतात जाऊन शेतकऱ्याला बेदम मारहाण केली.

लाकडी काठीने मारहाण करत असल्याचे व्हिडीओतून दिसून येत आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसावर कारवाईची मागणी शेतकऱ्याने केली आहे. या प्रकरणी पोलिसांत अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group