बुलडाण्यातील कंटेन्मेट झोनमध्ये ;पोलिसांवर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा प्रतिनिधी । बुलडाण्यातील कंटेन्मेट झोनमध्ये सोमवारी रात्री पोलिसावर हल्ला करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघे फरार आहेत. पोलिसांवरील या हल्ल्याचा शहरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

शहरातील कंटेन्मेट झोनमधील मस्जिद परिसरात मास्क का लावला नाही, असे विचारणाऱ्या कर्तव्यावरील पोलिस कर्मचारी राजेश निकाळजे यांना पाच ते सहा जणांनी मारहाण केली. यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जावेद खान याच्यासह पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

दरम्यान, जावेद खानसह तीन आरोपींना अटक करण्यात आली. यातील एक आरोपी माजी नगरसेवकाचा भाऊ असल्याचे कळते. बुलडाणा शहरात करोनाबाधित रुग्ण सापडल्याने तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, नागरिक विनाकारण बाहेर पडू नयेत यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Leave a Comment