Police Bharati 2024 | नुकतेच सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हा निर्णय होताच गृहविभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस पदांची भरती काढलेली आहे. एकूण 17000 पोलीस पदांची भरती निघणार आहे. याची जाहिरात प्रसिद्ध होणार असून 5 ते 31 मार्च पर्यंत उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे.
सध्या राज्यातील विविध शहरांची तसेच जिल्ह्यांची लोकसंख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे गुन्हेगारीत देखील वाढ होत आहे. आणि नवीन पोलीस ठाण्याचे निलंबित प्रस्ताव सध्याची सामाजिक स्थिती यामुळे मनुष्यबळ कमी पडण्याची स्थिती निर्माण होत आहे. सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू अशा कारणांमुळे आता पोलिसांची पदे रिक्त झालेली आहे.
अशातच आता 12 महिन्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी पोलीस भरती होणार आहे. यासाठी 17000 पदांची भरती होणार आहे. उन्हाळा संपल्यानंतर जून किंवा जुलैमध्ये या भरतीला सुरुवात केली जाईल. तत्पूर्वी उमेदवारांकडून 31 मार्चपर्यंत सर्व अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घेणार जाणार आहे. यासाठी पहिल्यांदा मैदानी नंतर लेखी परीक्षा होणार आहे. तसेच नोव्हेंबरमध्ये निकाल लागल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
रिक्त पदांचा तपशील | Police Bharati 2024
- जेल शिपाई – 1900 पदे
- एमआरपीएफ- 4800 पदे
- पोलीस शिपाई – 2300 पदे
महत्त्वाच्या गोष्टी
ही भरती राज्यातील 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रात होणार आहे. 26 फेब्रुवारीपासून 6 हजार नवप्रविष्ठ पोलिसांचे प्रशिक्षण चालू झालेले आहे. त्यामुळे आता नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यानंतरच नवीन भरती झालेल्या लोकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. जून किंवा जुलैमध्ये या सगळ्यांची एकत्रित परीक्षा होणार आहे. पहिल्यांदा मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे राज्यातील सर्व प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढवणार आहे.