Police Bharati 2025: तरुणांसाठी सुवर्णसंधी! तब्बल 10 हजार रिक्त पदांसाठी होणार पोलीस भरती

0
1
Police Bharati 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Police Bharati 2025 | राज्यातील तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता तब्बल 10 हजार रिक्त पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. ही भरती प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. यामध्ये डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.

महत्वाचे म्हणजे, राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊनच पोलिस दलात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत पावसाळ्यापूर्वीच मैदानी चाचणी पूर्ण करण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळे या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी आतापासून सुरुवात करावी लागणार आहे.

भरती प्रक्रियेत तीन टप्पे (Police Bharati 2025 )

लक्षात घ्या की, पोलिस भरतीमध्ये तीन मुख्य टप्पे असतात. मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, आणि मुलाखत. सुरुवातीला उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले जाते. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच पुढे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवले जाते. अंतिम टप्पा म्हणून मुलाखत घेतली जाते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी उमेदवारांनी शारीरिक क्षमता तसेच बौद्धिक क्षमता तपासली जाते.

शारीरिक पात्रता (Police Bharati 2025 )

पोलिस भरतीसाठी काही विशिष्ट शारीरिक निकषांची पूर्तता करावी लागते. पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची 165 सेमी, तर महिला उमेदवारांसाठी 155 सेमी असावी. तसेच, पुरुष उमेदवाराची छाती 79 सेमीपेक्षा कमी नसावी. या पात्रतेमध्ये धावणे, व्यायाम, आणि अन्य शारीरिक क्षमतांची चाचणी घेतली जाते.

दरम्यान, राज्यातील 10,000 रिक्त पदांसाठी होणारी ही भरती अनेक तरुणांच्या स्वप्नांना गवसणी घालणारी ठरणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच, भरतीच्या अधिकृत संकेतस्थळला भेट देत अपडेट जाणून घ्याव्यात.