हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Police Bharti 2025 – जे विद्यार्थी पोलीस भरतीची (Police Bharti 2025 ) तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गृह विभागाने 2024 ते 2025 दरम्यान रिक्त पदांची दखल घेतली आहे. यासाठीच सरकार तब्बल 10 हजार पदासाठी जाहिरात प्रकाशित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हि प्रकिया 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे जे उमेदवार या पदासाठी पात्र आणि इच्छुक आहेत , त्यांनी परीक्षेच्या सर्व अटीशर्ती लक्षात घेऊन तयारी करायची आहे.
12 ते 13 लाख अर्ज येण्याची शक्यता (Police Bharti 2025) –
सध्या उन्हाळा असल्याने, पोलिस भरतीच्या (Police Bharti 2025 ) मैदानी चाचणीचा कार्यक्रम उशिरा म्हणजेच गणेशोत्सवाच्या नंतर राबवला जाणार आहे. गणेशोत्सव 6 सप्टेंबरला विसर्जनानंतर लगेचच या भरतीसाठी प्रक्रिया सुरु होणार आहे. पावसाळ्यात चाचणी घेणं शक्य नसल्याने, ही भरती प्रक्रिया गणेशोत्सवानंतरच सुरु होईल. तसेच यंदा पोलिस भरतीसाठी 12 ते 13 लाख अर्ज येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी 2024 मध्ये 17 हजार पदांसाठी 17 लाख अर्ज आले होते, त्यामुळे या वर्षी अर्जाची संख्या काही लाखांनी जास्त होण्याची शक्यता आहे.
पूर्ण तयारी करणे आवश्यक –
पोलिस भरतीसाठी (Police Bharti 2025) मुख्य निकष असे आहेत की, उमेदवाराला एका ठिकाणीच अर्ज भरावा लागेल. दोन ठिकाणी अर्ज भरल्यास उमेदवाराचा अर्ज बाद होईल आणि असे उमेदवार चाचणीसाठी पात्र ठरवले जाणार नाही. तसेच हि भरती प्रक्रिया 4 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी उमेदवारांना पूर्ण तयारी करणे आवश्यक आहे. इच्छुक अन पात्र असण्याऱ्या उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर त्यांचे ग्राउंड घेतले जाईल. त्यानंतर लेखी परीक्षा होईल. यानंतर मेरिट लावले जाईल. त्यातून आघाडीवर असणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल.