हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Police Bharti 2025 । पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने पोलीस भरती संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस दलातील तब्बल 14,000 रिक्त पदांच्या भरतीला सरकारने मंजुरी दिली आहे. आज पार पडललेया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर 14,000 रिक्त पदांची चर्चा मागील अनेक दिवसापासून सुरु होती. अखेर आज या जम्बो भरतीला मंजुरी देण्यात आल्याने तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील फडणवीस सरकारने सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी ही मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तस बघितलं तर पोलीस दलात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही भरती (Police Bharti 2025) होणे खूप गरजेचं होत. मागील अनेक दिवसापासून तरुण वर्ग या भरतीसाठी तयारी करत आहे. मैदानी चाचणी असो वा लेखी परीक्षा…. या भरतीसाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. अशा तरुणांच्या मेहनतीचे आणि कष्टाचे या भरतीमुळे चीज होणार आहे. सरकणे या पोलीस भरतीला मंजुरी दिल्यानंतर आता लवकरच या भरतीसंदर्भातील जाहिरातही प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. महापालिकांच्या निवडणुकांच्या अगोदरची ही भरती प्रक्रिया पार पडेल अशीही चर्चा आहे. कारण महापालिका निवडणुकीवेळी गृहखात्यावर मोठा ताण असणार आहे. या पोलीस भरती अंतर्गत सदर उमेदवारांची शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत घेण्यात येईल. तसेच पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणते निर्णय घेण्यात आले? Police Bharti 2025
१) महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15 हजार पोलिस भरती करण्यास मंजुरी
२) राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ … सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण करणे
३) सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासासाठी Viability Gap Funding निधी देणे
४) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारित महामंडळांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल करणे तसेच शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ




