आमदार जयकुमार गोरेंची शिवीगाळ व दमदाटी तर शिवसेना नेते शेखर गोरेंवर अपहरणाचा गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कुळकजाई विकास सेवा सोसायटी मध्ये जिल्हा बँकेच्या निवडणूकिसाठी ठराव प्रक्रिया सुरू असताना अचानकपणे शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी येऊन ठराव प्रकिया बंद पाडली व मी सांगेल तिथे येऊन मी सांगेल त्या प्रमाणे ठराव करायचा अशी दमदाटी करून तिघांना गाडीत घालून घेऊन गेले असल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात सुनंदा शेडगे यांनी दिली आहे. तर भाजपचे माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांच्या वरती देखील दमदाटी व शिवीगाळ प्रकरणी सुरेखा बुधावले यांनी गुन्हा दाखल केला आहे.

या बद्दल अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यापासून जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारे विकास सेवा सोसायटी ठराव प्रक्रिया चालू आहे. यामध्ये अनेक ठिकाणी वादा वादी सारखे प्रकार होत असताना आज अचानक कुळकजाई विकास सेवा सोसायटी मध्ये जिल्हा बँकेच्या निवडणूकिसाठी ठराव प्रक्रिया सुरू असताना त्या ठिकाणी शेखर गोरे यांच्या सोबत सुनील जाधव, बशीर मुलानी, राजा जाधव, अमर कुलकर्णी, आप्पा बुधावले व इतर 20 ते 25 जाणंनी जाऊन दमदाटी करून तिघांना गाडीत घालून घेऊन गेले असल्याचा गुन्हा दहिवडी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.

तसेच २६ जानेवारी रोजी रात्री आमदार जयकुमार गोरे व त्यांचे चार कार्यकर्ते यांनी सुरेखा बुधावले यांच्या घरी जाऊन ‘तुज्या नवऱ्याला जीवे मारिन त्याला सांग माझा विरोधात जाऊ नको’ अशी धमकी व शिवीगाळ केली असल्याचा गुन्हा सुरेखा बुधावले यांनी दाखल केला आहे. सदर घटनेमुळे दहिवडी आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment