हिंगोली प्रतिनिधी | देशाचे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी देशभरात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. राज्यातही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व जिल्हे सील केले असून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आता पोलिस प्रशासनावर आहे. स्वत: चा जीव धोक्यात घालून पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. मात्र राज्यातील काही भागांत पोलिसांकडून विनाकारण बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप होतो आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कन्हेरगाव नाका येथील एका पोलिस कर्माचार्यालाच पोलिसांकडून बेदम मारहाण झाली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साहेबराव राठोड असे सदर पोलिस कर्मचार्याचे नाव अाहे. मुलीला घेऊन मेडिकल मधून औषध आणायला राठोड गेले असताना त्यांमा मारहाण झाल्याचे समजत आहे. काहीही विचारपूस न करता मारहाण झाल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे. याप्रकरणामुळे पोलिसांकडून सामान्य नागरिकांना विनाकारन मारहान केली जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी अत्यावश्यक गोष्टींकरता बाहेर पडणार्या नागरिकांवर पोलिसांनी बळाचा वापर करु नये असे सांगितले आहे. दवाखाना, अन्न-धान्य याकरता नागरिक बाहेर पडू शकतात असे शासनाने सांगितले आहे. मात्र तरिही राज्यात पोलिसांकडून अनावश्यक बळाचा वापर होत असल्याच्या घटना घडत आहेत.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”
धक्कादायक! गेल्या २४ तासात जगभरात २ हजार ३०६ मृत्यू, जाणून घ्या कोणत्या देशात किती रुग्ण ?
एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस
कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या
‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…
सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या