पुणे | सुनिल शेवर
सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीसांच्या अंगावर गणेशमंडळाचे कार्यकर्ते धावून गेल्याचा प्रकार पुण्यातील गुलटेकडी येथे घडला. यावेळी पोलीस कर्मचार्याला धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने तणाव निर्माण झाला.
हाती आलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवामुळे शहरात सुरक्षेच्या कारणास्तव कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी गणेशोत्सव मंडळ तपासणीचे कार्य गणेश उत्सवात करणे साहजिकच आहे. त्यानुसार पोलीस महानगरपालिका व्हेइकल डेपो, गुलटेकड़ी पुणे ३७ येथील गणेश मंडळाच्या इथे गेले असता त्यांच्या अंगावर बबलू पितले ( वय ३२) कात्रज, परशुराम बसप्पा होसमनी ( वय ३९ ) गुलटेकड़ी, राहुल रेवनअप्पा ढोणे ( वय १८) गुलटेकड़ी धाऊन गेले.
तिनही आरोपींना स्वारगेट पोलिसांनी अटक केली असून पोलिस शिपाई डी. डी. रणसिंह यांनी फिर्याद दिली. बीट मार्शल ड्यूटी करताना पोलिसांना धक्काबुक्की, जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस उपनिरिक्षक आर. आय. उसगावकर तपास करीत आहेत.