आरटीओ कार्यालयातील ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांना पोलीस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शासनमान्य मोटार वाहन प्रशिक्षण केंद्रातील 30 जणांचे पक्के वाहन चालक परवाना मंजुरीकरता 17 हजार 600 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेतील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ स्वप्निल माने (वय 32) एजंट अभिजित पवार (वय 33) यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अमोघ कलोती यांनी हे आदेश दिले. मुंबईचा पथकाने कारवाई केल्यानंतर आरोपींना औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने व त्यांचा खाजगी एजंट अभिजित पवार यांना सोमवारी मुंबईच्या पथकाने ताब्यात घेतले होते. हनुमान नगर गारखेडा येथील ड्रायव्हिंग स्कूल चालकाने परवाना नोंदणी नूतनीकरणासाठी अर्ज केला होता.

त्याच्या 30 प्रशिक्षणार्थी पक्के वाहन चालक परवाना घ्यायचा होता. त्यासाठी 17 हजार 600 रुपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. सोमवारी 12 जुलै रोजी पथक आरटीओ कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी एजंट अभिजित पवार यांच्याकडून शिक्के कागदपत्रे व रक्कम जमा केली होती. संबंधितास ताब्यात घेत या वेळी ड्राईडवर 100 वर नागरिक उपस्थित होते. दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Leave a Comment