पुणे : हॅलो महाराष्ट्र – भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांना सायबर पोलिसांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर नेत्यांवर आरोप प्रत्यारोप आणि त्यावरून होत असलेल्या कारवाईवरून आता नवे वादळ निर्माण झाले आहे.
भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव @PradipGavade यांना आज मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने अटक केली.
मुंबई पोलीस सत्ताधाऱ्यांच्या हातच खेळणं झाल आहे.सरकारवर टीका करण गुन्हा असेल तर तो आम्ही हजार वेळेस करू.@CPMumbaiPolice प्रदीपच्या केसाला जरी धक्का लागला तर जवाबदारी आपली असेल. pic.twitter.com/dbXcO2OJZl— Ram Satpute (@RamVSatpute) May 22, 2021
काय आहे प्रकरण
प्रदीप गावडे हे भाजयुमोचे प्रदेश सचिव आहेत. त्यांनी शरद पवारांबाबत आक्षेपार्ह Tweet केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जावळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्यावर मुस्लीम समाज, शरद पवार आणि रोहत पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी प्रदीप गावडे यांना ताब्यात घेतलं आहे. यानंतर भाजप आमदार राम सातपुते सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबई पोलीस सत्ताधाऱ्यांच्या हातच खेळणं झालं आहे. सरकारवर टीका करण गुन्हा असेल तर तो आम्ही हजार वेळेस करू. तसेच प्रदीव गावडे यांना बेकायदेशीर पद्धतीनं अटक केली असल्याचा आरोपदेखील आमदार राम सातपुते यांनी केला आहे.
प्रदीप गावडे यांच्या ट्विटर अकाऊंटवरूनही या कारवाईबाबत ट्विट करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी ट्विट केलेल्या पोस्टचा फोटोदेखील जोडण्यात आला आहे. या ट्विट वरून माझ्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी तक्रारी केल्या आहेत. मुळात या ट्विट मध्ये चुकीचे काहीच नाही आणि या ट्विट साठी माझ्यावर शंभर तक्रारी झाल्या तरी चालतील पण मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा किंवा इतर कोणत्याही हिंदू महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही, असे प्रदीप गावडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
या ट्विट वरून माझ्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्याने तक्रार केल्याचे समजते, मुळात या ट्विट मध्ये चुकीचे काहीच नाही आणि या ट्विट साठी माझ्यावर शंभर तक्रारी झाल्या तरी चालतील पण मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा किंवा इतर कोणत्याही हिंदू महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही.🚩 pic.twitter.com/jKW4rlu6IA
— Pradip Gavade 🇮🇳 (@PradipGavade) May 13, 2021
या अगोदरदेखील भाजपच्या काही नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी कारवाई केली गेली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली होती. अशा प्रकारे सोशल मीडियावरील पोस्ट आणि त्यावर तक्रारी, कारवाईचा खेळ सुरुच आहे. मात्र आता प्रदीप गावडे यांच्या अटकेचे राज्यात काय परिणाम होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.