उपासमारीने बेशुद्ध पडली होती महिला…कराड पोलिसांनी जे केलं ते पाहून तुम्हीही म्हणाल..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

तीन-चार दिवस उपाशीपोटी कराडमध्ये फिरणाऱ्या एका वृद्ध महिलेला कराड शहर पोलीस ठाण्यातील हवालदार मारूती चव्हाण आणि सहकारी पोलिसांनी आज तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात दिले. विमल बाबासाहेब आटोळे (वय ६५, रा. कोळे, ता. कराड), असे त्या महिलेचे नाव आहे. लॉकडाऊन मध्ये अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात कराड पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीच्या दर्शनाने त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

तीन-चार दिवसांपासून एक वृद्ध महिला कराडमध्ये फिरत होती. त्यांचे मानसिक संतुलन ठिक नसल्याचे जाणवत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील हे पेट्रोलिंग करत असताना ही महिला दिसली होती. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगून शहरात महिला एकटीच फिरताना दिसल्यास कळविण्यास सांगितले होते.

आज सकाळी विजय दिवस परिसरात बंदोबस्तावर असणाऱ्या हवालदार मारूती चव्हाण यांना ही महिला साईबाबा मंदीर परिसरात बेशुध्दावस्थेत आढळून आली. उपासमार झाल्यामुळे तिच्या अंगात त्राण नव्हते. हवालदार चव्हाण यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना कळविली. त्यांनी पोलिसांना सांगून कराड, सैदापूर परिसरात महिलेची माहिती स्पीकरवरून प्रसारीत केली. त्या आधारे त्या महिलेची सैदापूर बेघर वसाहतीत राहणारी मुलगी आणि नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला.

हवालदार चव्हाण यांनी त्या महिलेच्या तोंडावर पाणी मारून उठवले. बिस्किटे आणि पोलिसांसाठी आलेला नाष्टा खाऊ घातला. त्यामुळे काही वेळाने महिलेच्या अंगात उठून चालण्याइतपत त्राण आले. सदर महिलेची मुलगी आणि नातेवाईक आल्यानंतर त्या महिलेस उपजिल्हा रूग्णालयात नेऊन तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर नातेवाईक त्यांना घरी घेऊन गेले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/238748824014158/

Leave a Comment