Monday, January 30, 2023

देहविक्री करणाऱ्या 17 तरुणीसह 30 जणांना पोलिसांनी केले अटक

- Advertisement -

उस्मानाबाद | उमरगा येथे बुधवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास उस्मानाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गावर जकेकुर-चौरस्ता परिसरातील तीन हॉटेल्सवर छापा टाकला. यावेळी त्यांनी देहविक्री करणाऱ्या 17 तरुणींसह 30 जणांना ताब्यात घेतले.

याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांनी पथकाला इशारा देऊन बुधवारी या भागातील तीन हॉटेल आणि लॉज वर कारवाई केली. औद्योगिक वसाहत परिसरात अनेक हॉटेल्समध्ये वेश्या व्यवसाय सुरू आहे आणि याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे.

- Advertisement -

दुपारी साडेतीन वाजता ही कारवाई पूर्ण करण्यात आली. यानंतर त्या सर्वांनाच उमरगा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, पोलीस उपअधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने, सदानंद भुजबळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.