साताऱ्यात भीक मागणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार; एकास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा शहर व परिसरात भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका 25 वर्षीय विवाहितेवर दोघांनी सामुहिक अत्याचार तर इतर दोघांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात आज उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना सातारा तालुक्यातील जैतापूर येथे दि. 23 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास गावच्या पुलाजवळ निर्जन ठिकाणी घडली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी नम्या यंत्र्या भोसले ( रा. फडतरवाडी, ता. सातारा),किरडेट आशिर्वाद पवार ( रा. गोगावलेवाडी, ता. सातारा), भगत काप्या काळे (रा. बारटक्के चौक, सातारा), मयूर नागेश काळे (रा. फडतरवाडी, ता, सातारा) यांची चौकशी केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.

सातारा शहरामध्ये भीक मागत असलेली 25 वर्षीय महिला 23 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता तिच्या लहान मुलीसमवेत रहिमतपूर रस्त्यावर उभी होती. यावेळी संशयित हे दोन दुचाकीवरून तेथे आले. ‘तुला व तुझ्या मुलीला घरी सोडतो,’ असे म्हणून दोघींना दुचाकीवर बसविले. त्यानंतर ते दुचाकीवरून घरी निघाले. मात्र, जैतापूर गावच्या हद्दीतील पुलाजवळ आल्यानंतर त्यांनी दुचाकी थांबविली.

पीडित महिलेला ओडत रस्त्याच्याकडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली नेले. येथे नम्या भोसले आणि मयूर काळे या दोघांनी त्या महिलेवर सामुहिक अत्याचार केला. तर किरडेट पवार आणि भगत काळे यांनी त्या महिलेसोबत अश्लील कृत्य केले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितलास तर जीवे ठार मारेन, अशी तिला धमकी दिली.

या सर्व प्रकारानंतर सदर पीडित महिला व तिच्या मुलीला त्यांनी घराजवळ सोडले. आणि त्यांनी त्या ठिकाणाहून पोबारा केला. यानंतर पीडित महिलेने घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यात जाऊन दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून घेत रविवारी रात्री चारही संशयितांना अटक केली. महिला पोलीस उपनिरीक्षक डी. डी. मुसळे या अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment