लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात पोलिसांचे संचलन

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर कर्चे

कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाली असून फलटण तालुक्यात संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू केले आहेत. फलटण तालुक्यातील जनतेने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, यासाठी पोलिस, पालिका व महसूल विभागाने शहरात संचलन केले.

फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, पोलिस उपअधीक्षक तानाजी बर्डे ,फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी संचलन केले. सदर आदेशाची अंमलबजावणी करत असताना विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1987व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नूसार दंडनीय व कायदेशीर कारवाई संबंधित पोलिस अधिकारी कर्मचारी यांचे मार्फत करण्यात येईल ,असे फलटण उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांनी स्पष्ट केले.

कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या जमाबंदी व संचारबंदी आदेशाचे अनुषंगाने पोलीस व महसूल प्रशासन नगरपालिका यांचे तर्फे संचलन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. जमाबंदी व संचारबंदी आदेशाचे अंमलबजावणी बाबत आवाहन करण्याकरिता महात्मा फुले चौक, डेक्कन चौक ,महावीर स्तंभ ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, रविवार पेठ ,उमाजी नाईक चौक,असे संचलन करण्यात आले. यावेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप ,पोलीस उपाधीक्षक तानाजी बर्डे ,फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर ,महसूल कर्मचारी, पोलीस कर्मचारी व नगरपालिका कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like