औरंगाबाद : मराठा आरक्षणासह इतर मगण्यांसाठी अर्धनग्न आंदोलन करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी मंगळवार दि. 22 जून रोजी सकाळी आकाराच्या सुमारास ताब्यात घेतले. मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक मंगेश साबळे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मंगळवार पासून सलग पाच दिवस अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
आज (मंगळवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास आंदोलन करण्यासाठी मराठा समन्वयक विभागीय आयुक्त कार्यालय जवळ आले असता, पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारत असल्याचे सांगत आंदोलन रद्द करण्याच्या सूचना दिल्या. आंदोलकांनी पोलिसांसोबत वाद घालत आंदोलन करू देण्याची मागणी केली.
दरम्यान, या घटने वेळी मंगेश साबळे यांना पोलीस तब्यत घेत असताना. साबळे यांनी एक मराठा लाख मराठा तसेच छत्रपती शिवाजी महाराज कि जय असे म्हणत पोलीस व्हॅन मध्ये त्यांना बसवण्यात आले. साबळे यांना सिटीचौक पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतले