व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

चिल्लर जमा करून रुपया होत नाही काय, रणजितसिह निंबाळकरांचा शरद पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दिल्ली येथे राष्ट्रमंचच्या बॅनरखाली नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीवरून भाजपचे खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी टोला लगावला आहे. खासदार शरद पवारांनी बोलावलेली बैठक म्हणजे चिल्लर जमा करून रुपया होत नाही, अशा शब्दात निंबाळकरांनी टोला लगावर म्हंटल आहे कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर आज देशात कुणाची पात्रता नाही.”

माढा मतदार संघातील भाजपचे खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादीचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र. रणजितसिह नाईक यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पवारांनी दिल्लीत घेतलेल्या बैठकीवरून निंबाळकरांनी पवारांना तोलहीली लगावला आहे.

रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी पवारांच्या बैठकीबद्दल म्हंटल आहे कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर आज देशात कुणाची पात्रता नाही. बत्ती बुझने से पहले थोडी जलनी चाहिए, अशी परिस्थिती आहे या पक्षांची. या सर्व पक्षाचे अस्तित्व हे आता संपले आहे. ते आता एकत्र येत आहेत. असे अनेक प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, ते प्रयोग अयशस्वी झाले आहेत. राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार हे मोडीत निघालेल्या पक्षांना सध्या एकत्रित करू पाहत आहेत.