सहकारमंत्र्यांच्या सह्याद्रीवर धरणे धरण्यास जाणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी रक्कम अद्याप दिलेली नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर गुरुवार (दि.२५) आजपासून धरणे आंदोलन करण्यासाठी निघालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या  कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले आहे. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांच्या शाब्दिक वादावादी झाली.

राजू शेट्टी यांनी राज्याचे सहकार मंत्री आपल्या कारखान्याचे एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना देत नसतील तर इतर कारखानदारांकडून काय अपेक्षा करायची असा सवाल शेट्टी यांनी यापूर्वीच उपस्थित केला होता. राजू शेट्टी यांनी सहकारमंत्र्यांनी एफआरपी रक्कम लवकरात लवकर द्यावी, अन्यथा २५ मार्च पासून सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर धरणे धरणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज कारखाना स्थळाकडे जात असताना, मसूर गावाजवळ  त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले.

धरणे धरण्यास निघालेल्या कार्यकर्त्यांनी उस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, शेतकऱ्यांना पेपर पी रक्कम मिळालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आज पासून सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर एफआरपीचे पैसे मिळण्यासाठी मी बसणार आहे, तुम्ही या असे अवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like