Saturday, June 3, 2023

आषाढी एकादशी, बेंदूर व बकरीद ईदच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात पोलिसांचे संचलन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

चालू आठवड्यात आषाढी एकादशी, बेंदूर व बकरीद ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने कराड शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या उपस्थित रविवारी शहरातील विविध भागातून पोलिस संचलन करण्यात आले.

कोरोना संसर्गामुळे अद्याप लॉकडाऊन उठलेला नाही. सद्यस्थितीत अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. अशातच आषाढी एकादशीसह बेंदूर व बकरी ईद हे सण सलग तीन दिवसात येत आहेत. या सणांसाठी जिल्हा प्रशासनाने आदेशही जारी केलेला आहे. त्यामुळे कोणताही सण उत्साहात साजरा करता येणार नाही. कोरोना नियमांचे पालन करूनच येणारे सण साजरे करावे लागणार आहेत.

या सणांच्या पार्श्‍वभूमीवर कराड शहर पोलिसांनी शहरातील विविध भागातून आज संचलन केले. शहर पोलीस स्टेशन पासून सुरू झालेले हे संचलन दत्तचौक, कर्मवीर पुतळा, हेड पोस्ट, अशोक चौक, शिंदे गल्ली, बुधवार पेठ, संत गोरोबा मंदिर, जनता व्यासपीठ समोरून मुख्य मंडईतून चांदणी चौक, चावडी चौक ते ज्योतिबा मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बापूजी साळुंखे पुतळा, राज मेडिकल दत्त चौक, उंडाळकर पुतळा, संभाजी मार्केट समोरून शहर पोलीस स्टेशन पर्यंतच्या मार्गावर संचलन करण्यात आले.