सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलानी
राष्ट्रीय महामार्गावरील डी मार्ट समोर इनोव्हा गाडीने एका पादचाऱ्यास उडवले. पादचाऱ्यास उडवून पळून जाणार्या पोलीस महानिरीक्षकांच्या गाडीस स्थानिकांनी पाठलाग करुन पकडले. मात्र घटनास्थळावरुन पळ काढणार्या गाडीत विशेष पोलीस महानिरिक्षक असल्याचे समजताच स्थानिक पोलीसांनी त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
हाती आलेल्या माहितीनुसार, सातारा राष्ट्रीय महामार्गावरील डी-मार्ट जवळ एका भरधाव ईनोवा गाडी ने एका पादचाऱ्याला उडवले. यानंतर इनोव्हा गाडी न थांबता तशीच पुढे निघून गेली. ते पाहून संतापलेल्या स्थानिक नागरीकांनी गाडीचा पाठलाग केला आणि आनेवाडी टोलनाक्याजवळ गाडी अडवून ती पोलीसांच्या ताब्यात दिली.
मात्र गाडीत दुसरे तिसरे कोणी नसून विशेष पोलीस महानिरिक्षक असल्याचे समताच पोलीसांनी सदर गाडी कोणतीही नोंद न करता सोडून दिली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ईनोवा गाडी क्रमांक MH 09, 0108 कोल्हापूर वरुन पुण्याकडे जात असताना सदरील अपघात झाला. यासंदर्भात अपघात करून सदर गाडी घटनास्थळावरून पळून गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.