Satara News : खेड शिवापूर टोलनाक्यावर पोलिसांची मोठी कारवाई; 70 लाखांचा गुटखा जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पोलिस प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या विरोधात धडक मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी छापेमारी करत गुटख्यासह इतर अमली पदार्थ ताब्यात घेतले जात आहेत. दरम्यान पुणे-सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोलनाका येथे पोलिसांनी कारवी केली आहे. यामध्ये एका आयशर टेम्पोतून 70 लाखांचा गुटखा राजगड पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

नामदेव मधूकर लवटे (वय 28 वर्षे रा.निजामपूर ता.सांगोला, जि.सोलापूर), चेतन दत्तात्रय खांडेकर (वय 19 वर्षे, धंदा टान्सपोर्ट, राहणार दत्त मंदिरा जवळ, सुतारदरा,कोथरुड, पुणे, मूळ रा. निजामपूर, ता.सांगोला, जि.सोलापूर) असे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक लाल रंगाचा आयशर टेम्पो (MH11, CJ 4075) कर्नाटकमधून येणार असल्याची खबर राजगड पोलिसांना मिळाली. यानुसार सापळा रचून हा संशयित आयशर टेम्पो राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला असता पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग केला.

सदरचा टेम्पो खेड शिवापुर टोल नाक्यावर आला असता पोलिसांनी 70 लाखांच्या गुटख्यासह टेम्पो पकडून जप्त केला. तर गुटख्याचा पुरवठा करणारे शकीर निसार अलीमटटी (रा. विजापूर, कर्नाटक) व सद्दाम मेहबुब कोतवाल (रा.मंगोली, विजापूर कर्नाटक) या दोघांनी गुटखा पुरवल्याबद्दल त्यांच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.