फलटण | राजुरीच्या पोलीस पाटलाच्या विरोधात पोलीसांत पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर राजुरी येथील पोलीस पाटील लक्ष्मण सुहास बागाव यास पोलीस पाटील पदावरून निलंबित करण्यात आले. याबाबतचा आदेश उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी काढला असून निलंबनाची कारवाई केली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील राजुरी गावचे पोलीस पाटील लक्ष्मण सुहास बागाव यांचे विरुद्ध अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अटक करण्यात आलेली होती. त्यास दिनांक 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा सत्र न्यायालय सातारा येथे हजर केले असता, त्यांना 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली होती.
यानंतर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 चे कलम 11 अन्वये उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी राजुरी गावचे पोलिस पाटील लक्ष्मण सुहास बागाव यास पोलीस पाटील पदावरून तात्काळ निलंबित करण्याचा आदेश काढला आहे.