55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनो घरीच थांबा! मुंबई पोलीस आयुक्तांचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी रात्रंदिवस ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या ३ दिवसात मुंबई पोलीस दलातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वयस्क पोलिसांना कोरोनाचा धोका लक्षात घेत पोलीस आयुक्तांनी तातडीने पावलं उचलत 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना घरातच थांबण्याचे निर्देश दिले आहेत.

ज्या कर्मचाऱ्यांचं वय 55 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांनी बंदोबस्तात सहभागी होऊ नये, असं मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे जे पोलीस कर्मचारी कोरोनामुळे दगावले त्यांचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त होतं. त्यामुळे पोलीस कर्मचारी पर्यायाने त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयुक्त परमबीर सिंह यांनी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत आणि योग्य ती शासकीय नोकरी तसंच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. “पोलीस बांधवांचा मृत्यू ही अतिशय दु:खद आणि दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्र सरकार त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभं आहे,” असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment