जबलपूर : वृत्तसंस्था – सध्या सण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडताना दिसत आहे. यंदा तर नवरात्र उत्सव मोठ्या धमाक्यात झाल्याचे आपण पाहिलेच असतील. यादरम्यान काही ठिकाणी जत्रा देखील भरल्याचे आपण पाहिले असतील. या जत्रांमध्ये तरुणांचे आकर्षक वस्तू म्हणजे प्लास्टिकचे भोंगे (youth making noise). मग त्या भोंग्यांनी (youth making noise) इतरांना त्रास झाला तरी काही हरकत नाही. अशाच तरुणांना आळा घातला आहे जबलपूरच्या पोलिसांनी.
और बजाओ भोंपू 🤪 pic.twitter.com/SDfJyRCBcP
— Educators of Bihar (@BiharTeacherCan) October 6, 2022
जबलपूर जिल्ह्यातील गढ़ा पोलीस ठाणे येथील पोलिसांना जेव्हा काही तरुण अशी भोंगे (youth making noise) वाजवून लोकांना त्रास देत आहेत हे लक्षात आले, तेव्हा त्यांना धडा शिकवण्याचा ठरवून त्यांनी चांगलीच युक्ती चालवली आणि सध्या त्यांना मिळालेल्या शिक्षेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ गाजवत आहे.
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो दोन तरुण आपल्याला दिसतायेत आणि समोर पोलीस ही दिसत आहेत. एका तरुणाच्या कानाला भोंगा (youth making noise) लावलेला दिसतोय तर दुसरा तरुण त्या भोंग्यातून फुंकर मारताना दिसत आहे. या आवाजाने लोकांना कशा पद्धतीचा त्रास होतो हे त्यांना कळण्यासाठी अशी शिक्षा त्यांना देण्यात आली होती. एवढेच नाही तर या व्यतिरिक्त यांना उठा बश्या काढायला लावल्या होत्या तर कुणाला माफी मागायला देखील लावली होती. हा व्हिडिओ सध्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तर आत्तापर्यंत या व्हिडिओला वीस हजार लाईक आणि सात लाख 68 हजाराहून अधिक व्हुज मिळाले आहेत. तर शेकडो युजर्सनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!