जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | जिंतीनाका फलटण येथे सुरु असलेल्या ऑनलाइन चक्री जुगार अड्ड्यावर छापा मारून सुमारे एक लाख 69 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल फलटण शहर पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच दहा जणांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिंतीनाका फलटण येथील यशवंतराव चव्हाण पुतळ्याचे उत्तर बाजूस बंद शटरच्या गाळ्यात सुरू असलेल्या ऑनलाईन चक्री जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी संशयित मनोहर आत्‍माराम जाधव (रा. जिंतीनाका- फलटण) हा ऑनलाइन चक्री जुगार खेळण्यासाठी इतर इसमांकडून रोख रक्कम स्वीकारून जुगार अड्डा चालवत असताना पोलिसांना मिळून आला. या कारवाईत बंद खोलीत टीव्ही, एक कॉम्प्युटर, कीबोर्ड, माउस, केबल, जिओ कंपनीचा इंटरनेट डोंगल, एक लहान टेबल, एक मोठा टेबल, प्लास्टिक खुर्ची, चार प्लॅस्टिक स्टूल, पाण्याचे जार, दोन मोटारसायकली यासह रोख रक्कम मिळून आली. पोलिसांना सुमारे एक लाख 69 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आला .

तसेच जुगार खेळत असताना ज्ञानेश्वर उत्तम राजगुरू (रा. मलटण ता.फलटण), सुरज राजू जाधव (रा .मलटण, ता.फलटण), सागर बाबुराव जाधव (रा .जिंती नाका, ता. फलटण), वैभव संजय निंबाळकर (रा. विंचुर्णी, ता.फलटण), अतुल शिवाजी जाधव (रा. जिंती नाका, ता.फलटण), वसंत चव्हाण ( रा. जिंती नाका ता.फलटण), रवींद्र बाळू चव्हाण (रा. पलुस, जि.सांगली), मनोज आत्माराम जाधव (रा. जिंतीनाका, ता.फलटण), आकाश भाऊसाहेब सावंत (रा.फलटण), संतोष वसंत जाधव (रा. जिंती नाका, ता.फलटण) हे आढळून आले. वरील दहा संशयितांविरुद्ध पोलीस शिपाई अच्युत साहेबराव जगताप यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन रावळ, पोलीस हवालदार प्रदीप मदने, पोलीस नाईक वाडकर पोलीस नाईक तांबे, पोलीस शिपाई जगताप, चालक पोलीस नाईक घाटगे, पोलीस शिपाई दडस यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment