औरंगाबाद | नारेगाव परीसरात असलेल्या हमसफर ट्रॅव्हल्सच्या वर्कशॉपवर एमआयडीसी सिडको पोलिसांनी छापा मारला. याठिकाणी अवैधरित्या साठवलेले बायोडिझेल सह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, नरेगाव परिसरात हमसफर ट्रॅव्हल्स चे वर्कशॉप आहे त्या वर्कशॉप अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर टँकर भरून बायोडिझेलच्या साठा केला जात होता त्यावेळेस ला लागणारे बायोडिझेल हे वर्कशॉप वरूनच भरले जात होते याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी अचानक पणे हमसफर ट्रॅव्हल्स चा वर्कशॉपवर छापा टाकला.
त्या ठिकाणी त्यांना सिराज कादर मोहम्मद हे वाहनांमध्ये बायोडिझेल भरण्यासाठी मोठ्या लोखंडी टाकी मध्ये साठा करताना दिसले. वर्कशॉपवर बायोडिझेल भरलेले टॅंकर ड्रम मोटर पंप 22 लाख 97 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.