ऑनलाईन कॅसिनो अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 62 हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

खणभाग परिसरात असणार्‍या बदाम चौक येथील एका गाळ्यात सुरू असणार्‍या ऑनलाईन कॅसिनो जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत चौघांना ताब्यात घेतले. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कॉन्स्टेबल गणेश कांबळे यांनी कारवाई केली. या ठिकाणाहून एक मोबाईल, तीन कॉम्पुटर आणि रोख रक्कम असा एकूण 61 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अड्डा मालकासह चौघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. जुगार मालक युसूफ सलीम शेख, कामगार समीर शब्बीर बेग, सागर वसंत सपाटे आणि शाम शिवाजी कुकडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सांगली व मिरज हे कॅसिनो सिटी झाल्याचा आरोप भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी आता कारवाई करण्यास रसुरुवात केली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या बदाम चौकातील एका सेवन स्टार नावाच्या गाळ्यात ऑनलाईन कॅसिनो जुगार अड्डा सुरू होता. याची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कॉन्स्टेबल गणेश कांबळे यांनी त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी अड्डा मालक युसूफ शेख हा बेकायदेशीर कोणताही परवाना नसताना स्वतःच्या फायद्यासाठी कॅसिनो अड्डा सुरू केल्याचे निष्पन्न झाले.

तसेच कामगार समीर बेग याला पैसे देऊन एका गिर्‍हाइकामागे 1 रुपयास 36 रुपये असे ज्यादा रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून हा अड्डा सुरू केला होता. याठिकाणी कॅसिनो गेम खेळण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने याठिकाणाहून एक मोबाईल, तीन कॉम्प्युटर आणि रोख रक्कम असा एकूण 61 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Leave a Comment