औरंगाबाद : नामांकित कंपनीच्या मोबाईलचे बनावट साहित्य विक्री दुकानदारांवर कारवाई केली. पोलिसांनी सुमारे एक लाख 71 हजार 275 रुपयांचे बनावट साहित्य जप्त केले. साथिया थेटर परिसरातील हाय-फाय मोबाइल ॲक्सेसरीजचे दिनेश गलाजी चौधरी, कृष्णा मोबाईल शॉपीचे कांतीलाल किसन राम माली, मोरया मोबाईल शॉपीचे विनोद गुगळे, जय श्रीराम मोबाईल ॲक्सेसरीज चे स्पेअर पार्टचे नेमाराम मोहनलाल माली, परफेक्ट टेलिकॉमचे सय्यद विकार सय्यद नसीम यांचा समावेश आहे.
पैठणगेट भागातील पाच दुकानातून मोबाईल शोध बनावट साहित्य विक्री होत असल्याची माहिती अँटी पायरसी ग्रुप सर्विसेस एल. एल. पी. या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी रेवन्नाथ विष्णू (वय 39) त्यावरून केकान यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. क्रांती चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉक्टर गणपत दराडे यांच्या पथकाने मोबाईलचे बनावट साहित्य विक्री करणाऱ्या दुकानावर छापेमारी केली.
या कारवाईत पोलिसांनी पाचही दुकानातून जवळपास एक लाख 71 हजार 275 रुपयांचे बनावट ब्लूटूथ, हेडफोन, स्पीकर ,मोबाईलच्या बॅटरी आदी साहित्य जप्त केले. या पाचही जणांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.