Police Recruitment 2024 | दहावी बारावी झाल्यानंतर अनेक मुलांना तसेच अनेक मुलं आणि मुली पोलीस होण्याचे स्वप्न पाहतात. यासाठी त्यांना पोलीस भरतीची परीक्षा द्यावी लागते. राज्यात गेल्या वर्षी पोलीस भरतीची प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. आता पुन्हा एकदा पोलीस भरतीचा स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता राज्यामध्ये येत्या डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा पोलीस भरती केली जाणार आहे. आणि या भरती अंतर्गत तब्बल साडेसात हजार पदाची भरती केली जाणार आहेत. यातील 1300 पदे ही मुंबई पोलीस (Police Recruitment 2024) दलासाठी आहे. त्यामुळे मुंबईतील तरुणांसाठी ही एक चांगली बातमी आहे.
मागील वर्षी देखील राज्यांमध्ये पोलीस भरती पार पडली होती या भरतीमध्ये दोन वर्षात जवळपास 35 हजार पदांची भरती झालेली होती. परंतु आता पुन्हा एकदा डिसेंबर मध्ये मोठी भरती होणार आहे. 2022 – 2023 मध्ये देखील पोलीस भरती झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही पोलीस भरती पार पडणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे. त्यांनी लवकरात लवकर तयारीला जागा कारण तुमच्या हातात पुढील चार-पाच महिनेच आहेत.
कोरोना काळात पोलीस भरती रखडली | Police Recruitment 2024
2020 मध्ये करोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान माजवले होते. त्यामुळे सगळे व्यवहार ठप्प झाले होते. या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जवळपास तीन वर्ष पोलीस भरती झाली नव्हती. परंतु सध्या लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि पोलिसांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे मागील वर्षी ही पोलीस भरती राबवण्यात आलेली होती. आता पुन्हा एकदा डिसेंबर मध्ये पोलीस भरती होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
राज्यामध्ये पोलीस भरतीची (Police Recruitment 2024) प्रक्रिया राबविण्यात काही दिवसांपूर्वी आली होती. त्यावेळी 14 हजार 471 पोलीस पदांची भरती करण्यासाठी गृह विभागाकडून सर्व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले होते. या भरती अंतर्गत आतापर्यंत 25 जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई, 8 जिल्ह्यात चालक शिपाई आणि 5 जिल्ह्यांमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आता सप्टेंबरपर्यंत त्यांची भरती प्रक्रिया पूर्ण होणारच नाही करायची आहे. पावसाळ्यामध्ये पोलीस भरतीच्या मैदानासाठी मैदान न मिळाल्यामुळे या प्रक्रियेला उशीर झालेला आहे.
डिसेंबरमध्ये जी पोलीस भरती होणार आहे. त्या पोलीस भरती अंतर्गत मुंबई पोलीस दलासाठी 1300 पदांवर भरती केली जाणार आहेत. मुंबईमध्ये मागच्याच वर्षी 8000 पदांची भरती केली होती. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता सप्टेंबरमध्ये ते पोलीस दलात दाखल होणार आहे. या भरतीसाठी पोलिसांकडे आता 5 लाख 69 हजार अर्ज आलेले होते त्यापैकी 2572 पोलीस हवालदार, 917 चालक 717 तुरुंग हवालदार आणि 24 बॅट्समन पदांसाठी अर्ज करण्यात आलेले आहेत.