राज्यात लवकरच पोलीस भरती!! गृहमंत्री वळसे पाटलांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात लवकरच पोलीस भरती होणार असून महाराष्ट्र शासनाने राज्यात सन 2020 ची पोलीस शिपाई संवर्गातील 7231 रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शासनाने पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या नव्या दुरुस्तीचा लाभ पोलिस दलास होणार असून, त्यांना ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या बदलाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पोलिस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे. तर राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलिस शिपाई (पुरुष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण १०० गुणांची होणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.

लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल. सदरहू पोलिस भरतीमधील लेखी परीक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पद्धतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.

Leave a Comment